भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना युवकांच्या व्यसनांच्या दुर्बलतेचा व मानसिक पारतंत्र्याचा विचार आला व या गुलामीतुन तरूण मुक्त व्हावेत या विचाराने दि. १५ ऑगस्ट १९९६ रोजी भादे ता. खंडाळा जि. सातारा येथील कीर्तनात गुरूवर्य बंडातात्या कराडकर यांनी हे विचार प्रगट केले व मुलांना अवाहन केले. कदाचित एकही तरूण प्रवृत्त होणे शक्य नाही असे वाटत असतानाच ३० मुलांची नावे मिळाली व आश्चर्य वाटले.
आपण मार्गदर्शन केल्यास तरूण मुले सहज बदलतील व व्यसनमुक्त होतील याची खात्री वाटली व तेथुन पुढे प्रत्येक कीर्तनात हा प्रचार चालू ठेवला. या प्रचारात असा अनुभव आला की अनेक वर्ष दारूसारखे भयंकर व्यसन असणारी माणसे सुध्दा व्यसनांपासून परावृत्त होतात हेच काम सांघिकपणे केल्यास चांगला प्रतिसाद मिळेल व बहुसंख्य तरूण व्यसनमुक्त होतील हा विश्वास वाटल्याने अशा मुलांची संघटना तयार करण्याचे ध्येय बाळगले.
अधिक...