व्यसनमुक्त युवक संघ आपल्या संस्कारशिबिरांमध्ये नित्याेपासनेचे महत्त्व शिबिरार्थींना समजावून देणेकरिता दैनंदिन उपासनेमध्ये श्रीसमर्थ रामदास महाराज रचित मनाचे श्लोक, श्रीदत्तात्रेयांचे २४ गुरु, श्रीज्ञानेश्वर महाराज रचित ज्ञानेश्वरी अध्याय ९ व १२, आचार्य विनोबाजी भावेकृत गीताई इ. वेचक साहित्याचे पारायण आयोजित करतो. याच संस्कारोपयोगी साहित्याचे संकलन करून युवकांना सुलभ दैनंदिन उपासनेच्या दृष्टीने सुलभ नित्योपासना या ग्रंथांची निर्मिती करणेत आली आहे. संस्कारक्षम व्यक्ती, कुटुंब व सत्पथगामी समाज निर्मितीचा उदात्त मानस असणार्या व संस्कारवर्ग सुरु करण्याची आंतरीक तळमळ असणार्यांनीच या ग्रंथाचा उपयोग योग्य तो करावा.
।।रामकृष्णहरि।।
टीप :- वरिल प्रचारपुस्तिका मिळविण्यासाठी वेबसाइटवरिल संपर्क पर्यायावर जाऊन आपले जवळच्या संघटना शाखेशी किंवा कार्यकर्त्यांशी संपर्क करावा. तसेच खालील ठिकाणी वरिल साहित्याची खरेदी सेवामुल्य देवून करता येईल.
१. श्री. मारूतीबोवा कराडकर मठ, झेंडे गल्ली, पंढरपूर.
२. श्री. मारूतीबोवा कराडकर मठ, चाकण रोड आळंदी.
३. श्री. मारुतीबोवा कराडकर मठ, गुरुवार पेठ, कराड.
४. वैष्णव सदन, कोपर्डे हवेली, कराड.
टीप:- आमची प्रकाशने वरील ठिकाणीच मिळतात. कोणाही पुस्तक विक्रेत्याकडे आम्ही विक्रीस देत नाही, याची नोंद घ्यावी व छापील किंमतीपेक्षा जास्त पैसै घेतल्यास तक्रार करावी.